Posts

Showing posts with the label अशोक

Ashok

मागे आपण आवळ्याविषयी माहिती घेतली. आता आपण अशोक या वनस्पतीची माहिती घेऊ या. स्त्रियांच्या शोकाचे हरण करतो म्हणून अशोक म्हणतात. स्त्रियांच्या सर्व आजारांवर अशोकाचा आयुर्वेदात वापर करतात. अशोकाच्या सालीचे चूर्ण, अशोकारिष्ट, काढा असा अनेक प्रकारे उपयोग होतो. गर्भाशयाचे विकार, मासिक पाळीचे विकार, सन्तती न होणे यावर उत्तम उपयोग होतो. बंगल्यांच्या आवारात, रस्त्याच्या कडेला सरळसोट वाढणारा खरा अशोक नव्हे. तो खोटा अशोक. खरा अशोक वेगळा. त्याला फांद्या असतात. सज्जनगडावर खरा अशोक खूप आहे. रावणाने सीतेला अशोकवनात ठेवले होते. खरा अशोक गर्भाशयाचे उत्तम टॊनिक आहे. मूळव्याधीतून रक्त जाणे, सन्डासला रक्त पडणे, यावर याचा उपयोग होतो. अशोकाची पाने, साल यांत ओषधी गुण आहेत. वसन्त पंचमीला वसन्तोत्सवासाठी याची पूजा करतात. मदमस्त, यॊवनभाराने वाकलेल्या तरूणीने याला लाथ मारल्यास तो फुलतो असे प्राचिन साहित्यात वर्णन आढळते. अशोक चूर्ण, अशोकरिष्ट, पाने वापरावीत.