Posts

Showing posts from 2015
सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

कापूर

Image
          'कापूर' हा अतिशय पांढरा शुभ्र असतो. तो अतिशय थंड आहे. भगवान श्री शंकर कापराच्या रंगाचे आहेत म्हणून त्यांना ‘ कर्पूरगौर ’ म्हणतात. कोणत्याही देवतेची आरती झाल्यानंतर कर्पुरारती लावण्याची प्रथा आहे. कापूर जाळला असता हवेतील रोगकारक जंतू नाहीसे होतात. कापूर उडनशील आहे. तो उघडा ठेवला असता उडून जातो. म्हणून तो बंद डब्यात ठेवावा.          कापराच्या अनेक जाती आहेत.त्यात भीमसेनी कापूर श्रेष्ठ आहे. बाजारात जो सध्या कापूर मिळतो, तो अस्सल कापूर नव्हे. तो रासायनिक आहे. अस्सल भीमसेनी कापूर काष्ठौषधीच्या दुकानात मिळतो. कापूर थंड आहे. कापराचे तेल कोथ (कुजणे) नाशक आहे. वेदनाशमनासाठी कापराचे तेल वापरतात. तसेच इसबासारख्या त्वचा विकारांवर हे तेल वापरतात. कापूर डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याने डोळ्यांच्या औषधात कापूर वापरतात. दाढदुखी, दात किडणे, सुजणे, दंतरोग यावर कापूर वापरतात. हल्ली लोकप्रिय झालेली विविध वेदनाशामक मलमे, औषधे, सर्दीवरील औषधे, यामध्ये कापूर असतो. कापराच्या झाडाच्या चिकाचा कापूर म्हणून वापर करतात.          द म , सर्दी, खोकला, घशाचे आजार, आवाज बसणे यावर कापराच

शतावरी

                      शतावरी वनस्पतीच्या मुळ्या जास्त औषधी असतात. या मूळ्याचे चूर्ण, स्वरस, काढा औषधात वापरतात. शतावरी ही उत्तम शक्तीवर्धक आहे. एकूणच शरीराचे बल शतावरीने वाढते. अशक्तपणा, उत्साह न वाढणे, यावर शतावरीचे चूर्ण रोज दुधाबरोबर घ्यावे. त्यामुळे बलवृद्धी होऊन रोगप्रतिकारशक्तीही उत्तम वाढते. शरीरयष्टी बारीक असणे, वजन न वाढणे, यावर शतावरी चूर्ण घ्यावे.         शतावरीच्या सहाय्याने तेल, तूप सिध्द करतात. शतावरीच्या तेलाने मालीश केली असता वजन वाढते. शतावरी घृताचे नियमित सेवन केले असता बल प्राप्त होते. आम्लपित्त, घशाशी जळजळ, त्यामुळे पोटात दुखणे यावर शतावरी चूर्ण घ्यावे. तसेच अल्सरचा त्रास असल्यास शतावरी चूर्ण तुपातून घ्यावे. त्यामुळे पेप्टेक अल्सर बरा होण्यास मदत होते.           शतावरी कल्प तर प्रसिद्धच आहे. ज्या काही औषधांमुळे आयुर्वेद प्रत्येक घरात आहे त्यापैकी एक म्हणजे शतावरी कल्प. याचा मुख्य उपयोग हा सध्या प्रसुतीनंतर अंगावर नियमित व भरपूर दूध येण्यासाठी होत असला तरी तो सर्वांनी दुधाबरोबर शक्तीवर्धक म्हणून घावा. लहान मुलांनाही शक्तीवर्धक पेय म्हणून द्यावे. गर्भार अवस्

वसंत ऋतूतील काळजी

मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.            वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो.              वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हलके पदार्थ आहारात असावेत. तसेच नविन तयार झालेले धान्य लगेचच खाऊ

शिशिरातील काळजी

महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात. धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात. यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील. सर्दी, शिंका, खोकला-   धूर, धुळीमुळे प

नववर्षाभिनंदन

सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!