गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

नाचणी


         नाचणीलाच ‘नागली’ असेही म्हणतात. नागलीचे पापड प्रसिद्धच आहेत. नाचणीची भाकरी, आंबील करतात. नाचणीचे सत्त्वही लोकप्रिय आहे.
        नाचणी ही हलकी, पौष्टिक, बलदायक, थंड, भूक भागविणारी आहे.

        नाचणीचे सत्त्व विशिष्ट पद्धतीने काढतात. नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यातून काढावी. नंतर बारीक वाटावी. म्हणजे त्यातून दुधासारखे पाणी निघेल. ते पाणी गाळून कढईच्या भांड्यात स्थिर ठेवावे. हळूहळू नाचणीचे सत्त्व भांड्यात तळाशी जमा होईल. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. तळाशी साचलेले सत्त्व वाळवून वापरावे. हे सत्त्व पचायला हलके, पौष्टिक, शक्तीवर्धक आहे. विशेषत: मधुमेही रुग्णांमध्ये नाचणीच्या सत्त्वाचे पदार्थ द्यावेत.

       नाचणीच्या भाकरी, नाचणीचे पदार्थ खाल्ले असताही मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित रहाते.  नाचणीचे पापड याच गुणांचे आहेत, म्हणून पचायला हलके आहेत.

       वजन कमी करण्यासाठीही नाचणीचे पदार्थ खावेत. अशक्तपणा न येता वजन कमी होते.

1 टिप्पणी:

Vinay Singh म्हणाले...

मुझे आपकी blog बहुत अच्छी लगी। मैं एक Social Worker हूं और Jkhealthworld.com के माध्यम से लोगों को स्वास्थ्य के बारे में जानकारियां देता हूं। मुझे लगता है कि आपको इस website को देखना चाहिए। यदि आपको यह website पसंद आये तो अपने blog पर इसे Link करें। क्योंकि यह जनकल्याण के लिए हैं।
Health World in Hindi