सोमवार, २२ एप्रिल, २०१३

हसा, पण लठ्ठ होऊ नका ! भाग- २


मंडळी,
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेक जाहिराती वाचल्या, बघितल्या असतील. त्यातील काही थोड्या तर बऱ्याच फसव्या सुद्धा असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी  शास्त्रशुद्ध माहिती मिळतच नाही. नेचरकेअर वेलनेस क्लिनिकतर्फे हर्बल मेडीसिनबरोबच आहार, योगासने यांचा शास्त्रशुद्ध कोर्स तयार करण्यात आहे. यातील औषधे दर्जेदार आणि गुणकारी आहेतच, जोडीला आहार नियंत्रण व योगासनांचे मार्गदर्शन यामुळे आपले वजन निश्चितच योग्य नियंत्रणात राहील. शिवाय आपल्या व्यवसायाचे / कामाचे  स्वरूप, सवयी, उंची, बांधा यानुसार दिलेल्या कोर्सच्या नियमित पालनामुळे कमी झालेले वजन नेहमी नियंत्रणात राहील.
पण आवश्यकतेपेक्षा कमी वजन ठेवा असे आम्ही कधीच सांगत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, बांध्यानुसार योग्य वजनाचे प्रमाण निरनिराळे असू शकते. या कोर्समुळे अशक्त, रोगट शरीरापेक्षा निरोगी, सुदृढ समाज तयार होईल अशी आमची खात्री आहे. या कोर्समध्ये आपल्याला औषधांची किट दिली जाईल. औषधे मोजकीच असून घ्यावयास सोपी आहेत. सोबत आहारनियंत्रण, आसने, ३० मिनिटे चालणे यामुळे खूप फायदा होईल.
डाएटींगचा अर्थ हल्ली खाणे कमी करा असा घेतला जातो. त्याऐवजी आहारनियंत्रण असा योग्य अर्थ आहे. वजन कमी करण्यासाठी खालील सहा पदार्थ पूर्ण बंद करा.
भात, बटाटा, साखर, पोहे, साबुदाणा, मुरमुरे, त्याशिवाय फळांचा रस, शीतपेये, मिठाई, आईस्क्रीम, चॉकलेट, मैदा, बेकरीचे पदार्थ, फणस, आंबा, द्राक्षे, चिक्कू इ. फळे.
आहारात पुढीलप्रमाणे पदार्थ असावेत.
धान्य व कडधान्य- ज्वारी, बाजरी, भाजलेले गहू, (भाजलेले तांदूळ चालतील), कोवळा मका, नागली, कोवळा हरभरा, सोयाबीन, मूग, राजगिरा, कुळीथ, जव, सातू, साळीच्या / ज्वारीच्या लाह्या, भाजके धान्य, भिजवलेली व मोड आलेली कडधान्ये
भाज्या- मटार, पत्ताकोबी, आंबटचुका, पालक, भोपळा, काकडी, शेवगा, फरसबी, गिलके, तोंडले, पडवळ, डांगर, दोडके, कारले, घोळ, टमाटे, चवळीच्या शेंगा, वांगे, मुळा, बीट, ओली हळद, आले / सुंठ
फळे- आवळा, रामफळ, अंजीर, पेरू, जांभूळ, खजूर, कवठ, संत्री, मोसंबी, डाळींब, लिंबू, खरबूज, टरबूज, पपई, मनुका, स्ट्रॉबेरी
पेय- ऊसाचा रस (ऊसाचा रस आपण गोडी आणण्यासाठी साखरेऐवजी मुक्तपणे वापरु शकतो. कारण तो अतिशय कमी कॅलरीने युक्त आहे.), ताक, शहाळ्याचे पाणी, गायीचे दूध, स्कीम्ड मिल्क, मध, नीरा
मांसाहार- मासे, कोंबडीचे मांस, अंड्यातील पांढरा बलक
तेल, तूप यांचा वापर अतिशय कमी करावा. बिना फोडणीचे वरण, डाळ, वाफवलेल्या भाज्या, भाजलेला पापड, सॅलड, गायीच्या दुधाचे दही, गायीचे तूप वापरावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: