Posts

Showing posts from February, 2013

करंज

Image
       करंज ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानोमाळ उगवते. करंजाच्या बियांपासून तेल काढतात. हे अतिशय उपयुक्त तेल आहे. करंज तेल उत्तम व्रणशोधक, व्रणरोपक आहे. हे तेल जखमेला लावतात. त्यामुळे जखम लवकर भरून येऊन नंतर व्रणही रहात नाही. जखमेत पू झाला असेल तरी हे तेल नियमित लावले असता पू कमी होऊन जखम भरते. अर्थात हे प्रयोग वैद्याच्या सल्ल्यानेच करावेत.          तसेच खरूज, नायटे, खाज, विविध त्वचेचे रोग यावर करंज तेलाचा उत्तम उपयोग होतो. सोरीयासीस, एक्झिमा या आजारांवर करंज तेल नियमित लावले असता ते आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात.          करंजाच्या झाडाच्या काड्यांचा उपयोग पूर्वी दात घासण्यासाठी करीत असत. कडूनिम्बाच्या काड्यांप्रमाणेच करंजाच्या काड्यांनीही दात स्वच्छ होतात, हिरड्या मजबूत होतात. सूज आली असता, मुका मार लागला असता तेथे पानांचा कल्क बांधावा.          करंज ही वनस्पती कृमीनाशक आहे. म्हणून पोटात जंत असल्यास पानांचा किंवा सालीचा रस घ्यावा. भूक न लागणे, अजीर्ण यावरही पानाचा रस घ्यावा. डोक्यात खवडे होणे, खाज, केसातील कोंडा यावर करंजाचे तेल डोक्याला नियमित लावावे.