मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

शरदाचे चांदणे २


मंडळी, 
          शरद ऋतूत विरेचन व रक्तमोक्षण या कर्मांबरोबरच आहारविहाराची पथ्येही पाळावी लागतात. रात्री विशेषतः जडान्न खाऊ नये. दही, क्षारयुक्त पदार्थ, बर्फ, थंड पदार्थ, जास्त खारट, आंबट, तिखट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. भेळ, मिसळ, शेव, चिवडा, वडे, भजे, इडली, डोसा, पाणीपुरी आदि पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत. जास्त चहा पिऊ नये. भात, ज्वारी, गहू, डाळी, द्विदल धान्ये वापरावीत.
          पुरणपोळी गायीचे तूप टाकून खावी. लसूण, लोणचे पूर्णपणे बंद करावे. विविध फळे, मोरावळा, चांगले तूप खाण्यात असावे. आहार मोजकाच घ्यावा. पोटाला तडस लागेल इतके जेऊ नये.
          शरद ऋतूत 'अगस्ती' ता-याचा उदय दक्षिणेला होतो. याचे माहिती आपण घेतली आहेच. अगस्ती ता-यामुळे शुद्ध झालेले पाणी या ऋतूत प्यावे. दिवसा ऊन जास्त असल्याने उन्हापासून बचाव करावा. टोपी, छत्री, गॉगल यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आहार विहार ठेवल्यास हे शरदाचे चांदणे आपणाला निश्चितच सुखकर व आल्हाददायक वाटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: