शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आभार             मंडळी, आपण सर्व सुजाण वाचकांनी माझ्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादामुळे पेज व्हिव्युज हे २५००० च्या वर गेले आहेत. व्यवसायामुळे माझे अनियमित लिखाण, वाचकांच्या ई पत्राला लवकर उत्तर न देणे, ब्लॉगची साधी सरळ भाषा, ब्लॉगला सजावट नसणे, किंचित लाजाळूपणामुळे स्वत:चा उदो उदो न करणे, माझ्या या सर्व त्रुटी आपण पोटात घालून मला जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिले याबद्दल आपले शतश: आभार ! 
            दोन बायका सांभाळणा-यांची काय हालत होत असेल हे दोन ब्लॉग चालविताना मला कळले. त्यामुळे दुस-या ब्लॉगकडे खूप दुर्लक्ष्य झाले. याबद्दल क्षमस्व !
           यापुढेही आपण असाच प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवावा ही विनंती.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: