कवठ (कपित्थ)

    कवठ हे वसंत ऋतूत येणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची गूळ घालून चटणी करतात. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून कवठाचे सेवन करतात. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. 
    दक्षिण महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी मिळते. अतिशय रुचकर असा हा खाद्य पदार्थ आहे. कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठ हे अम्लपित्तावर खावे. काविळीवर कवठाच्या पाल्याचा रस घ्यावा. 
    कवठाने आवाज चांगला होतो. कवठ खोकल्यावर गुणकारी आहे. 
    मात्र कच्चे कवठ खाऊ नये. चांगले पिकलेले कवठ खावे. असे हे बहुगुणी कवठ आहे.

Comments

डॉक्टर खुप छान माहिती देत आहात तुम्ही :-)

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड